डॉ. अमिता कुलकर्णी

सामाजिक बांधिलकी जपणारी कौटुंबिक पार्श्वभूमी लाभलेल्या डॉक्टर अमिता कुलकर्णी यांचा जन्म पुण्याचा. शालेय, कॉलेज तसंच पुढील वैद्यकीय शिक्षणही पुण्यातच झालेले. महिला व बाल आरोग्य विषयक काम करणाऱ्या सामाजिक संस्थांबरोबर देश तसेच परदेशात काम करत  आयुष्याचा अर्ध्याहून जास्त काळ कार्यमग्न असलेल्या डॉक्टर अमिता हिमालयाच्या दरवर्षीच्या वारकरी आहेत. उत्तराखंडात वैद्यकीय अधिकारी म्हणून दीर्घकाळ  काम करतांना हिमालयाच्या दुर्गम भागात केलेल्या  पदभ्रमंतीने आलेली अनुभवसंपन्नता मांडताना त्यांचं, मराठीच्या जोडीलाच हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी भाषेवरचे प्रभुत्व कायम उपयोगी सिद्ध झालय. फोटोग्राफीसारखा छंद जोपासताना हिमालयात आणि परदेशात स्वतः काढलेले हजारो फोटोज ही डॉक्टर अमिता कुलकर्णी यांच्या लिखाणाची जमेची बाजू आहे.    

@@BEFORE-BODY-END-DATA@@