रेणू दांडेकर

 संस्थापक, लोकमान्य टिळक विद्यामंदिर, चिखलगाव 
कौशल्यपूर्ण, प्रकल्पाधारित शिक्षणातून चिखलगावामध्ये डॉ. राजाभाऊ आणि रेणू दांडेकर यांनी उत्तम विद्यार्थी घडविले. चांगल्या समाजासाठी विद्यार्थी घडविण्याचे काम हे दाम्पत्य करीत आहे. शिक्षणासंबंधी लोकमान्य टिळकांनी मांडलेले विचार आचरणात आणून ते कृतीत उतरविण्याचे कार्य दांडेकर दाम्पत्याने केले आहे.